मॉर्फ केलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत मुलीची बदनामी

0
414

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मुलीचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मिडीयावर व्हायरल करत तिची बदनामी केली. हा प्रकार 23 सप्टेंबर रोजी दुपारी थेरगाव येथे घडला.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार Gairiirnsiing हा इंस्टाग्राम आयडी धारक प्रमोद पंजाबराव गुंड पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचा फोटो मॉर्फ करून तो त्याने बनवलेल्या इंस्टाग्राम खात्याच्या प्रोफाईलवर ठेवला. त्यानंतर त्या खात्यावरून फिर्यादी यांच्या मुलीचे फोटो मॉर्फ करून ते मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करत मुलीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.