मॉन्जिनीज केक शॉपची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

0
212

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मॉन्जिनीज केक शॉपची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 12 लाख 12 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 8 ते 20 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

राजेश किरणचंद संघवी (वय 53, रा. रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9593203357 क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संघवी यांना मोंगिनीज कंपनीचे केक शॉप सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन माहिती घेतली. त्यांनी 18001216986 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने संघवी यांना [email protected] .in या साईटवर अॅप्लिकेशन करण्यास सांगितले. संघवी यांना तीन बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर 12 लाख 12 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल्स सामान, केकचे प्रकार पाठविण्यात येणार होते. मात्र आरोपींनी त्यांना केक शॉप संबंधित कोणतेही सामान न पाठवता त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.