मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार

113

पुणे, दि. १७ (पीसीबी) – पुण्यात मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणाने मित्राशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले तसेच ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणासह त्याचे मित्र, आई आणि बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी रेहान सय्यद, शाहरुख शेख, सोहेल पठाण तसेच रेहानची आई आणि बहिण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत तरुणी आणि आरोपी रेहान सय्यद ओळखीचे आहेत. रेहानने तिला जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. रेहानने मित्र अरबाज शेखशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले होते. संबंधित ध्वनीचित्रफित आरोपी शाहरुख आणि सोहेल यांना रेहानने पाठविली होती. त्यानंतर शाहरुख आणि सोहेलने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली.

धमक्या तसेच त्रासामुळे पीडीत तरुणीने या घटनेची माहिती रेहानची आई तसेच त्याच्या बहिणीला दिली. तेव्हा दोघींनी तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.