मैत्रिणीच्या घरात जाऊन मारहाण करणाऱ्या मित्राला अटक

50

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – मैत्रिणीच्या घरात जाऊन तिला चप्पलने मारहाण केली. मैत्रिणीशी गैरवर्तन केले. तिने विरोध केला असता मित्राने तिच्या तोंडात हात घालून नखांनी ओरखडे घेत तिला जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी पिंपरी येथे घडली. तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

उमांश चौधरी (वय 23, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता चौधरी हा फिर्यादींच्या घरी आला. त्यावेळी त्यांच्यात बोलण्यातून वाद झाला. त्यावरून त्याने तरुणीला चप्पलने मारले. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. फिर्यादी तरुणीचा विरोध कायम राहिल्याने त्याने तरुणीच्या तोंडात हात घालून तिच्या तोंडाच्या आतील बाजूला नखांनी ओरखडून तिला जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.