मुस्लिम, दलित, आदिवासी समाज आपल्यापासून बाजुला का गेला ?

0
75

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुस्लिम, दलित, आदिवासी समाज आपल्यापासून बाजुला का गेले याचा विचार केला पाहिजे. आजार ओळखून ओषध केले पाहिजे, मग यश आपलेच आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

  • राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील शन्मुखानंद हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात के बोलत होते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकित महायुतीला ठेच लागली हे मान्य केलेच पाहिजे. आता दगडधोंडे बाजुला केले पाहिजेत. मुंबईचा विकास केला, पण निवडूण आले किती आपले. सर्वात महत्वाचे म्हणजे दोन समाज आपल्याला सोडून बाजुला झालेत. मुसमानांवर बोलून त्यांना दुखावले. याबाबत मी स्वतः नरेंद्र मोदींना त्याबाबत सांगितले. ४०० पार चा नारा आणि प्रचार असा झाला की संविधान बदलायचेय, असा संदेश गेला. खुद्द मोदींनी खुलासा केला पण तोपर्यंत लोकांच्या डोक्यात तो विषय गेला होता. दोन मोठे समाज म्हणजे किती मोठी लोकसख्या झाली. तीच बाजुला गेली तर आपले काय, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.
    आता चार महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे. संविधान बदलायचा प्रश्न इथे येतच नाही. मुस्लिम, आदिवासी, दलित, ओबीसी, भटके हे आपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील. तसा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून हे करावेच लागेल. ही मते घावलून आपण कसे निवडूण येणार नाही. मुळात त्याचाच फायदा आपल्या विरोधकांना झाला. उत्तर प्रदेशात तेच घडले, असे भुजबळ म्हणाले.