मुलाला जीवे मारण्याची धमकी देत मागिली 30 हजारांची खंडणी

0
212

वृद्ध व्यक्तीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत 30 हजार रुपये खंडणी मागितली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) रात्री पावणे बारा वाजता साने चौक कृष्णानगर, चिंचवड येथे घडली.

प्रमोद भुरे (रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. नागपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मारुती रामराव भंडारे (वय 73, रा. साने चौक, कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भंडारे त्यांच्या घरी असताना आरोपी जबरदस्तीने त्यांच्या घरात आला. तुझ्या मुलाने काय केले आहे माहिती आहे का, त्याची फळे भोगायला तू तयार रहा. तुझ्या मुलाला माझ्यापासून वाचवायचे असे तर मला 30 हजार रुपये दे, नाहीतर तुझ्या मुलाला कुठे मारून टाकेल हे तुला समजणार नाही, अशी धमकी देत प्रमोर भुरे याने फिर्यादी भंडारे यांच्याकडे खंडणी मागितली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.