मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी

0
83

पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 30 ते 40 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे. मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून सकाळी फोन आला. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाले. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत.

पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मुरलीधर मोहोळ यांनी पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. त्यामुळे कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठऱणारा आहे.

पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

नाव : मुरलीधर किसान मोहोळ जन्म मुळशी 9 नोव्हेंबर 1974

शिक्षण : 1999 मध्ये BA कोल्हापूर युनिव्हर्सिटी दरम्यान कुस्तीची आवड

मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकीर्द?

पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी 2002, 2007, 2012 आणि 2017 झाले आहेत

2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते.

उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद

पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष 2017-2018

संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) -2017-2018

संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) 2017-2018

सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 2017-2018

सामान्य जनता ते पक्षश्रेष्ठी; सगळ्यांमध्ये दांडगा संपर्क
मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेत उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते. सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठीसोबत दांडगा आहे.

महाराष्ट्रातून मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?

  • नितीन गडकरी, भाजप, विदर्भ
  • पियुष गोयल, भाजप, मुंबई
  • रक्षा खडसे, भाजप, उत्तर महाराष्ट्र
  • मुरलीधर मोहोळ, भाजप, पश्चिम महाराष्ट्र
  • रामदास आठवले, आरपीआय
  • प्रतापराव जाधव, शिवसेना, विदर्भ