मीच त्यांना तिकडे पाठवले, लढायला लावले… हे सगळे खोटे – अजितदादा

0
155

पोटात एक ओठात दुसरे असे अजितदादांचे कधीच नसते याचे प्रत्यंतर आज पुन्हा आले. रोखठोक अजितदादांनी मावळातील विरोधी उमेदवार संजोग वाघेरे यांच्याबाबत मोठा खुलासा केला. २०१९ मध्ये पार्थ पवार यांचा पराभव ज्यांनी केला त्याच खासदार श्रीरंग बारणे यांची पाठराखण दादांनी केली आणि गेल्यावेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने विजयी कऱण्याचे आवाहनसुध्दा केले.

महायुतीच्या पहिल्यात मेळाव्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक्याचे प्रथमच दर्शन झाले. त्यावेळी दादा म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. गेल्यावेळी पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. आपला विरोधी उमेदवार संजोग वाघेरे यांच्याशी अनेक वर्षाचे संबंध आहेत. परंतु, निवडणुकीची प्रचार यंत्रणा सुरू झाल्यावर काही गोष्टी पाळाव्या लागतात.

१३ तारखेचे मतदान होईपर्यंत विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, गप्पा-टप्पा मारायला जाऊ नका, निवडणूक काळापर्यंत नातेसंबंध बाजूला ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. वाघेरे सांगत आहेत की, मीच त्यांना तिकडे पाठवले, लढायला लावले. हे सगळे खोटे असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.