मित्रासोबत गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण, तिघांना अटक

0
594

मित्रासोबत गेलेल्या तरुणाला लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.11) काळेवाडी येथे घडली.याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याप्रकरणी अर्पण जितेंद्र गायकवाड (वय 18 रा.काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी हर्षवर्धन संतोष कदम (वय 19 रा.काळेवाडी), बालाजी अण्णाराव महामुनी (वय 20 रा. काळेवाडी) व प्रियांश कमलसिंग रावत (वय 19 रा.काळेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर क्रीश व श्रेयस गिरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चा मित्र प्रियांशु व क्रिश यांच्यात वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून प्रियांशू हा फिर्यादी यांना गाडीवर सोबत घेवून गेला.यावेळी झालेल्या भांडणात फिर्यादी यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावरून पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.