मारुती भापकर यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज अवैध

0
68

भोसरी, दि. 30 (पीसीबी) : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयामध्ये विहित मुदतीत २४ उमेदवारांनी ३३ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली.

भोसरी विधानसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने दाखल केलेल्या २४ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जांपैकी १८ अर्ज वैध ठरले आहेत व ६ अर्ज अवैध ठरले आहेत. २४ उमेदवारांनी ३३ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी ६ उमेदवारांची उमेदवारी अवैध ठरली आहे.

वैध उमेदवारांची यादी :-
१.अजित दामोदर गव्हाणे (नॅशनल काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार ),२.शलाका सुधाकर कोंडावार (अपक्ष), ३.अरुण मारुती पवार (अपक्ष), ४.डोळस हरेश बाजीराव (अपक्ष),५.जावेद रशीद शहा (अपक्ष),६.महेश किसन लांडगे (भारतीय जनता पार्टी),७. गोविंद हरिभाऊ चुनचुने (अपक्ष),८.सुभाष मारुती वाघमारे (अपक्ष),९.अमजद महेबूब खान (ऑल इंडिया मजली ए इंकिलाब ए मिल्लत),१०.रवी लक्ष्मण लांडगे (अपक्ष), ११.खुदबुददीन आबु होबळे (अपक्ष),१२.रफीक रशीद कुरेशी (अपक्ष), १३. सुरज चंद्रकांत गायकवाड (भारतीय राष्टीय कॉंग्रेस),१४.रामा मोहन ठोके (बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी),१५. दत्तात्रय कोंडीबा जगताप (अपक्ष),१६.बलराज उद्धवराव कटके (बहुजन समाज पार्टी), १७. परमेश्वर गोविंदराव बुर्ले (राष्ट्रीय समाज पक्ष), १८.संतोष काळूराम लांडगे (अपक्ष).

अवैध उमेदवारांची यादी :-
१.राहुल गोरख नेवाळे २.ज्ञानेश्वर सुरेश बोराटे ३.पूजा महेश लांडगे ४.प्रकाश सखाराम डोळस ५.भापकर मारुती साहेबराव
६.विकासराजे बापूसाहेब केदारी.

भोसरी २०७ विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक श्री.ललित कुमार दाहिमा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.