मायमर हॉस्पिटल परिसरातून चंदनाचे झाड चोरीला

0
17

ळेगाव, दि. 9 (प्रतिनिधी)
पिंपरी, दि.९ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथील मायमर हॉस्पिटल परिसरातून चंदनाचे झाड अज्ञातांनी चोरून नेले. ही घटना 3 जुलै रोजी मध्यरात्री एक ते पहाटे तीन वाजताच्या कालावधीत घडली.

दयानंद संभाजी देसाई (वय 46, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील मायमर हॉस्पिटल परिसरात असलेल्या मेंटेनन्स विभागासमोर चंदनाचे झाड होते. 3 जुलै रोजी रात्रीच्या वेळी अज्ञातांनी सुमारे 23 वर्ष जुने 60 हजार रुपये किमतीचे 25 फूट उंचीचे झाड तोडून चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.