माध्यमांत घबराट, सोमय्यांचा नंगानाच दाखविणाऱ्या लोकशाही चॅनलवर ७२ तासांची बंदी

0
382

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा नग्न व्हिडीओ आणि चाळे दाखविल्यामुळे लोकशाही चॅनलवर ७२ तासाची बंदी लादण्यात आली आहे. मोदी सरकारने अशा प्रकारे भाजप विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद कऱण्याची कारवाई सुरू केल्याने इतरवेळी माध्यमस्वातंत्रावर गळा काढणारी माध्यमे आता अवाक्षर बोलायला तयार नाहीत. आपल्यावरही गदा कोसळेल या भितीपोटी एकही न्यूज चॅनल, न्यूज पेपर अथवा पत्रकारांची संघटना या अन्यायावर साधी प्रतिक्रीया द्यायलाही तयार नाही. इंदिरा गांधी यांच्या आणिबाणी मध्ये माध्यमांवर बंदी घातली होती म्हणून देशभरातून मीडियाचे मालक-चालक आणि पत्रकारांनी रस्त्यावर उतरून दाद मागितली होती. आता मोदी सरकार विरोधात बोलणाऱ्या संपादक, पत्रकार आणि माध्यम कंपन्याच्या मुस्क्या आवळायला सुरूवात झाल्याने चौथ्या स्तंभातील तमाम पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांत काहिशी घबराट आहे. लोकशाही चॅनलवरची कारवाई अन्याय असल्याने मुंबई मराठी पत्रकार संघटना, मराठी पत्रकार संघटना, मंत्रालय पत्रकार संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लिल व्हिडिओ समोर आला होता. या संदर्भातील बातमी लोकशाही मराठी या न्यूज चॅनलने दाखविली होती. यावरून आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची माहिती लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच ही कारवाई करण्यात आल्याने माध्यमांची गळचेपी असल्याची टीका केंद्र सरकारवर केली जात आहे.

लोकशाही चॅनले संपादक कमलेश सुतार म्हणाले, या प्रकऱणात आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत. एकतर्फी कारवाई अत्यंत चुकिची आहे. राज्यातील पत्रकारांच्या संघटना आमच्या पाठिशी आहेत.