माणुसकीला काळीमा,महिलेवर रुग्णवाहिकेत अत्याचार,चालकाने केली जबरदस्ती

0
49

उत्तर प्रदेश,दि. ६ (पीसीबी) –

उत्तर प्रदेशात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. २० ऑगस्ट रोजी सिद्धार्थनगर जिल्ह्यात एका रुग्णवाहिकेत महिलेवर लैंगिक छळ केल्याची व तिच्या पतीचा ऑक्सिजन सपोर्ट काढून मृत्यूस कारणीभूत ठरल्याची घटना समोर आली आहे.

ही महिला तिच्या पती हरिश यांना उपचारासाठी बस्ती मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन चालली होती. डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयाची फी परवडत नसल्याने महिलेने पतीला घरी नेण्याचा निर्णय घेतला.

रुग्णवाहिकेतून जात असताना, चालकाने महिलेवर बसण्याची जबरदस्ती केली. या घटनेत चालक व त्याच्या सहकाऱ्याने महिलेवर लैंगिक छळ केला. महिलेने विरोध केला तेव्हा त्यांनी पतीचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला आणि दोघांनाही रुग्णवाहिकेतून बाहेर फेकले. त्यामुळे हरिश गंभीर जखमी झाला.

महिलेच्या भावाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली, आणि पोलिसांनी हरिश यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपींना अटक-

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालकाने तिचे दागिने चोरले व तिला धमकी दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असली, तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. लखनौच्या गाझीपूर पोलीस ठाण्यात या घटनेची लेखी तक्रार देण्यात आली आहे. लखनऊ उत्तरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जितेंद्र दुबे यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक कारवाई सुरू आहे.

या घटनेने उत्तर प्रदेशात मोठी खळबळ माजली असून, प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.खरंतर ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे महिलांवर अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत प्रशासनाचा तसेच पोलिसांचा वचक राहिलेला दिसत नाही गुन्हेगारांना कायद्याची भीती नसल्याने असे गुन्हे दररोज घडताना दिसत आहेत या देशात स्त्री सुरक्षित आहे की नाही हाच एक मोठा प्रश्न आहे.