माझा जातीपातीच्या राजकारणाचा बळी गेला – शिवाजीराव आढळराव पाटील

0
64

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर महायुतीला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. काही जागांवर तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या उमेदवारांनी पक्ष बदलला पण तरीही यश मिळालं नाही. अशाच प्रकारे शिरूर मतदारसंघातही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यंदाही शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाबाबत बोलताना माझा जातीपातीच्या राजकारणाचा बळी गेल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

या निवडणुकीत विकासकामांना प्रधान्य न देता कामाचा माणुस आणि बिनकामाचा अशी लढत झाली. यामध्ये जातीपातीच्या राजकारणाची खेळी खेळली गेली त्यातच पराभव झाल्याचा खंत शिवाजी आढळरावपाटीलांनी व्यक्त केली. परावभवानंतरही न थांबता माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या जनतेसाठी काम करत रहाणार असल्याचे आढळरावपाटीलांनी जाहीरपणे सांगितलं.

2008 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. या मतदारसंघात सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात. जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ आहेत. शिवसेनेमध्ये असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील 2009 आणि 2014 मध्ये निवडून आले होते. मात्र 2019 ला राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होती. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्याने त्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला. मात्र त्यानंतर राजकी गणिती बदलेली दिसली.

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर आढळरावांनी शिंदे यांच्या बाजूने गेले. त्यानंतर राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी बंड केल्यावर महायुतीकडून ती जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली होती. तिकिटामुळे आढळरावांनी परत एकदा अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. शिरूरच्या जागेवर अजित पवार गट वि. शरद पवार गट अशी लढाई पाहायला मिळाली. मात्र शिरूरमध्ये तुतारी आढळरावांना पराभूत केलं आणि अमोल कोल्हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले.