माजी उपहापौर सुदाम लांडगे यांचे आकस्मित निधन

0
452

पिंपरी, दि. २८(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपहापौर सुदामराव लांडगे यांचे आकस्मित निधन झाले. भाजपाचे युवा नेते शिवराज लांडगे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनामुळे इंद्रायणीनगर आणि भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सुदामराव लांडगे यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे (वय -६७) यांचे हृदविकाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. २००४ मध्ये ते उपहापौर होते. माणुसकी असलेल्या अत्यंत दिलदार अशा नेत्याला गमावल्याची भावना आहे. भोसरी परिसरात शोक व्यक्त करण्यात आला. माझा सहकारी आणि भाजपा युवा नेते शिवराज लांडगे यांचे ते वडील होत. शहराच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. त्याचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. लांडगे कुटुंबियांचा आणखी एक मार्गदर्शक हरपला आहे. दोन दिवसांपूर्वी श्री. गोपीकृष्ण धावडे यांचे वडील आज श्री. शिवराज लांडगे यांचे वडील आम्हाला सोडून गेले. ‘‘कायम आधार’’ वाटणारे ही माणसं अशी सोडून जात आहेत. त्यांची उणीव कधीही न भरुन येणारी आहे, अशा शब्दात आमदार महेश लांडगे यांनी आदरांजली वाहिली.