महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण

0
26

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

जागेच्या वादातून एका महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.

बालाजी शिंदे (वय 42, रा. नखातेनगर, धनगरबाबाब मंदिराच्या मागे, थेरगाव) आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 45 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 3) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्या जागेवरून वाद आहे. या कारणावरून 30 आणि 31 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्यात भांडण झाले. या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. तसेच घराच्या खिडक्यांवर दगड मारून काचा फोडून नुकसान केले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.