महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

134

तळेगाव दाभाडे, दि. १८ (पीसीबी) – किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करून तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

श्रेयस श्रीकांत पेंडसे (वय 32, रा. कडोलकरकॉलनी, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरासमोरील किराणा दुकानातून सामान घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांना अडवून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी तळेगाव मधील एका हॉटेल समोर वडिलांची वाट पाहत थांबल्या असता आरोपी कार मधून आला. त्याने फिर्यादीकडे पाहून अश्लील हावभाव करून त्यांच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.