महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकवणाऱ्यास अटक

0
144

महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. हे घटना रविवारी (दि. ७) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.

राजेश रतन काळे (वय 19, रा. बारणे कॉर्नर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी या काळेवाडी फाटा येथील मुकेश किराणा स्टोअर येथून गुढीपाडव्याचे साहित्य खरेदी करून दुकानातून बाहेर पडल्या. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीची ओळख पटली. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.