महिलेची पर्स हिसकावली

58

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) – पादचारी महिलेची एका चोरट्याने पर्स हिसकावली. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी हिंजवडी फेज तीन येथे घडली.

अहमद महंमद रफिक शेख (वय 34, रा. हिंजवडी फेज तीन) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हिंजवडी फेज तीन येथून पायी चालत जात होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांचे तोंड दाबून त्यांच्या हातातील पर्स आणि त्यातील पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.