महिंद्रा कंपनी मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 10 लाखांची फसवणूक

0
179

निघोजे, दि. १५ (पीसीबी) – महिंद्रा कंपनी मध्ये नोकरी लावतो म्हणत महिलेची 10 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 6 नोव्हेंबर 2023 ते 5 फेब्रुवारी 2024 या कालावधीत निघोजे महिंद्रा कंपनी येथे घडली आहे.

याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिलेने बुधवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. यावरून अभिषेक अशोक खालकर (वय 29 रा. वल्लभनगर) व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवले. यासाठी फिर्यादी कडून वेळोवेळी अशी 10 लाख 41 हजार 500 रुपये घेतले. फिर्यादी यांनी काही कालावधीनंतर विचारण केली असता महिंद्रा कंपनीचे बनावट ऑफर लेटर पाठवले. तसेच फिर्यादी यांच्याकडून घेतलेला ब्लँक चेक परत न करता फिर्यीद यांची फसवणूक केली आहे. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.