महाराष्ट्र राज्य सहकारी गृह निर्माण संस्था फेडरेशन अध्यक्षपदी सुहास पटवर्धन

140

पुणे, दि.23 (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य सहकारी गृह निर्माण संस्था फेडरेशन या राज्य स्तरीय संस्थेच्या अध्यक्षपदी सुहास पटवर्धन (पुणे) यांची अध्यक्ष पदी तर प्रकाश दरेकर(मुंबई) यांची उपाध्यक्ष पदी तर मानद सचिव पदी भास्कर म्हात्रे (नवी मुंबई) यांची बिनविरोध निवड झाली.सुहास पटवर्धन हे पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष आहेत.

आज दिनांक २३ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे संचालक मंडळाची निवडणूक सहायक निंबंधक महेश कुमार गायकवाड (ठाणे जिल्हा) यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.श्री गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

या प्रसंगी खालील संचालक उपस्थित होते.सीताराम राणे,ठाणे,संभाजी जाधव,कोल्हापूर., नंद कुमार काटे,सातारा.,श्रीमती जयश्री मराठे,धुळे.,प्रकाश रथकंटीवार,.नागपूर.
ॲड.वसंतराव तोरवणे,नाशिक.,

नूतन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुहास पटवर्धन यांनी बिन विरोध अध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल सर्व संचालकांचे आभार मानले आणि संस्थेचा कार्य विस्तार राज्यव्यापी करण्यावर भर दिला जाईल,सर्व संचालकाच्या मदतीने हे कार्य आपण पुढे नेऊ,असे नमूद केले.
मावळते अध्यक्ष सीताराम राणे यांनी आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि जिल्हा स्तरावरील संस्थांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील राहू,असे आश्वासित केले.नूतन उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी गृह निर्माण संस्था समोरील आव्हाने पेलण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहून कार्य करत राहू,असे प्रतिपादित केले.
मानद सचिव भास्कर म्हात्रे यांनी गृह निर्माण संस्थेच्या जिल्हा स्तरीय पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी नियोजन करण्यात येईल तसे प्रशिक्षण साहित्य तयार करून कार्यवाही करू,असे नमूद केले.
सर्व नूतन पदाधिकारी मंडळींचा संचालकांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला..