महापालिकेची अनधिकृत बांधकाम, पत्राशेडवर सलग दुसऱ्यादिवशी कारवाई

139

पिंपरी दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर सलग दुसऱ्यादिवशी कारवाई करण्यात आली. च-होली, वाकड भागात आज (बुधवारी) कारवाई करण्यात आली.

ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाकड परिसरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये कारवाई करण्यात आली. वाकड ते बीआरटीएस, भुजबळ चौकातील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली. या कारवाईत 62 पत्राशेड पाडले. अंदाजे 1 लाख 62 हजार चौरस फुट बांधकाम पाडले. 

ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 च-होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथील नियोजित 45 मीटर रुंद रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आले. पत्राशेड, वीट बांधकाम, आरसीसी अशी 20 बांधकामे पाडण्यात ईआली. अंदाजे क्षेत्रफळ 21 हजार 390 चौरस फुट अनधिकृत बांधकामावार कारवाई करण्यात आली.