महापालिका निवडणुका अधांतरिच…

17

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी अधांतरीच राहिली आहे. आजच्या नियोजित तारखेला सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या याचिकेवर गेल्यावर्षी जुलैपासून वारंवार तारखा पडत आहेत. सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण आहे. घटनापीठाचे कामकाज झाल्यानंतर मेन्शनिंग होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे.