महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेचा संदेश जगाला दिला : सचिन साठे

88

पिंपरी, दि. ३ (पीसीबी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतालाच नव्हे तर, संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांचे अनुयायी फक्त भारतात नव्हे, तर जगात सर्वत्र आहेत. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, बराक ओबामा हे नेते देखील महात्मा गांधी यांच्या विचारांचे अनुयायी आहेत. महात्मा गांधी यांनी चले जाव चा नारा दिला. त्यानंतर देशभरातील जनता स्वातंत्र्यलढ्यात उतरली आणि ब्रिटिशांना भारत देश सोडावा लागला.

तसेच साधी राहणी व उच्च विचारसरणी असणाऱ्या स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देखील आपल्या आचार विचारातून आदर्श जगापुढे ठेवला आहे. त्यांनी दिलेला जय जवान जय किसान चा नारा पुढे हजारो वर्ष देशाला उपयोगी आहे. देशात अन्न देणारा आणि संरक्षण करणारा सक्षम असेल तरच देशातील नागरिक सुरक्षित राहतील. या महान नेत्यांच्या जयंती दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस काँग्रेस सचिन साठे यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त देहूरोड रेल्वे स्टेशन येथे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभाग आणि देहूरोड स्टेशन कर्मचारी वर्ग, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ आणि लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते. यावेळी साठे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देहू रोड रेल्वे स्टेशन परिसरात देशी झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये अर्जुन, करंज, घेवडा, बकुळ, बांबू , सीता, अशोक, कडुनिंब, कांचन या देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस विभाग पर्यावरण अध्यक्ष अक्षय शहरकर, देहू रेल्वे स्टेशन प्रबंधक रतन रजक, लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डीचे अध्यक्ष अनिल भांगडिया, लिओ क्लब ऑफ आकुर्डी युथचे हरशीत शर्मा, व्यंकटेश दळवी, हाजी मलंग, गफूर शेख, व्यंकटेश कोळी, विरेन रामनारायण, अमर नाणेकर, देविदास जाधव, रमेश मुरुगकर, इंद्रजीत गोरे, मंगेश मोरे, प्रकाश पवार, मनोज ढकोलिया, देवानंद ढगे, सिद्धांत रिकीबे, कृष्णा चिकटे, अनिल कदम, सचिन धावरे, अनिकेत इंगोले, सुनील ओटले, विशाल म्हेत्रे, सचिन कांबळे, मयूर रिकिबे, अमोल तेलगे, बालाजी सुरवसे, विठ्ठल झोडगे, हिरामण गवई, राजेश शर्मा, वसंतकुमार गुजर, दर्शिता श्रीपाद, अमोल परदेशी, धरमचंद प्रजापती, लतीका पटेल आदी उपस्थित होते.