- वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मराठा समाजाला कोणी टार्गेट करतयं का …
दि . २७ ( पीसीबी ) – जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणावेत यासाठी झालेल्या मानसिक आणि शारिरीक छळामुळे वैष्णवी हगवणेला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. तसंच यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हुंडाबळीची प्रथा चर्चेत आली आहे. वैष्णवीच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबाला लग्नात 51 तोळं सोनं, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. यानंतरही दोन कोटींच्या जमिनीसाठी तिचा छळ करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी पुण्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली असून, यावेळी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील बांधवाची महत्वाची बैठक पार पडली. पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये मराठा बांधवांची बैठक झाली. यावेळी वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यात होणारी प्रथा परंपरा यावर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थित होते.
पुण्यातला मराठा समाज यापुढे कोणताही रोटी बेटी व्यवहार करणार नाही, असा ठराव पुण्यातील मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच अनेक समाजहिताचे निर्णय घेण्यात आले. लग्न करताना काही तरी आचारसंहिता असावी असं मत मांडण्यात आलं. समाज म्हणून आपल्याला या ठिकाणी एकत्र यावे लागेल. मुहूर्त वर लग्न लागत नाही, ते वेळेवर लागेल याचा प्रयबत केला पाहिजे असंही सांगण्या आलं.
मराठा समाजात धाक नाही. मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. समाजाची बदनामी होते आहे. जाणीव पूर्वक मराठा समाज टार्गेट होतो आहे का? विशिष्ट एका पक्षाला, जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाज हगवणे यांनी केलेल्या कृत्याचं समर्थन करणार नाही. ही जी घटना झाली एका समाजातच होत नाही, सर्व समाजात ही वृत्ती आहे. समाजाला टार्गेट करण्याचे काम चालू आहे अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
लग्नाचे प्रदर्शन होत आहे. मराठा समाज मस्तवाल आहेत असे चित्र उभे केले जाते. राजकीय मराठी लोकांनी पक्षाची कवाडे बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. समाज संस्था म्हणून आपण काम केलं पाहिजे. मीडियातून मराठा समाजाची सध्या बदनामी सुरू आहे आचारसंहिता करताना सुनांनी कसं वागायचं, नंदाने कस वागायचं हे शिकवा. विश्वास व्यक्त करायला हवा मुलीला शिकवा. तिला स्वतःच्या पायावर उभे करा असं सांगण्यात आलं.
दुसऱ्याने मोठे लग्न केले म्हणून आपण पण केले पाहिजे हा हट्ट नको, प्री-वेडिंग शूट म्हणजे अतिशय घाणेरडे प्रवृत्ती आहे. मुलीला शिकवा,तिला तुम्ही विश्वास द्या आई वडील भाऊ आम्ही सोबत आहोत.मराठा समाजातील एका वर्गाला समज नसून माज आला आहे हे आज मान्य करायला हवं.लग्न टीळे याचा राजकीय करण झालं आहे. पुणे शहरातील काही गावे तिथं तुम्ही मांडव टाकायला आठ वीस लाख देतात. पुण्यात वीस लाखाच्या आत लग्नच होत नाही. भाषणबाजी बंद करा,लग्न कमी वेळेत आणि कमी लोकात करा,कमी खर्चात करा.साखरपुडा हळद एकत्रीत केलं जावे. शाहू महाराज म्हटले होते जमीन विकून मुलीचे लग्न करू नका अशी आठवण करुन देण्यात आली.
अल्पशिक्षित मुलाचा लग्नाचा मोठा प्रश्न आहे. आम्ही कसेही लग्न करायला तयार आहोत, हुंडा द्यायला तयार आहोत असं सांगितलं आहे. मुलीच्या अपेक्षा वाढल्या आहे 25 टक्के मुलाचे लग्न होणार नाही हा प्रश्न आहे.