मनसे विधानसभेच्या २०० ते २२५ जागा लढवणार

0
105

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळाची तयारी करत असल्याचं चित्र आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट ‘दोनशे पार’चा नारा दिला आहे. आपण २०० ते २२५ जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करायची आहे, असं राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं. विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. तर उद्धव ठाकरेंविषयी जनतेच्या मनात राग आहे. त्यांना मराठी माणसांनी नव्हे, तर मुस्लिम समाजाने मत दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी करताना दिसत आहेत. विधानसभेच्या २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करा, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत.
महायुती किंवा महाविकास आघाडीचं जागावाटप काही ठरत नाही. मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही, कुणाशीही जागावाटपाची चर्चा करणार नाही. आपल्याला विधानसभेच्या २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवायची आहे.

लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं नाही. मराठी मतदार आपली वाट बघतोय. ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदी विरोधातील मतदान आहे. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालं, अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते-पदाधिकारी यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं.