मतमोजणीच्या आधीच उघडली पोस्टल बॅलेट मताची पेटी ? एसडीएम सह इतर अधिकाऱ्यांचे निलंबन

0
163

बालाघाट,दि.३०(पीसीबी) – मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पोस्टल बॅलेटमध्ये अनियमिततेबाबत काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. बालाघाटचे उपविभागीय दंडाधिकारी गोपाल सोनी यांना निलंबित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ.गिरीशकुमार मिश्रा यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार बालाघाटचे एसडीएम आणि बालाघाट विधानसभा निवडणूक अधिकारी गोपाल सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच बालाघाटचे उपजिल्हाधिकारी राहुल नायक यांच्याकडे बालाघाट एसडीएमचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

या निलंबनाबाबत काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष केके मिश्रा यांनी ट्विटरवर सांगितले की, या प्रकरणी यापूर्वी नोडल अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस जर या प्रकरणी ‘खरंच कन्फयुज्ड’ होती तर इतक्या लोकांना निलंबित का केले जात आहे. बालाघाट जिल्ह्याशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही कर्मचारी मतपत्रिका ठेवताना दिसले. कर्मचारी पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मतपत्रिका शिस्तबद्ध पद्धतीने ठेवल्या जात असल्याचा युक्तिवाद प्रशासनाकडून करण्यात आला. याप्रकरणी एका नोडल अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला तक्रार पत्रही दिले होते. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि संघटना प्रभारी राजीव सिंह आणि उपाध्यक्ष आणि निवडणूक आयोगाचे कार्य प्रभारी जेपी धनोपिया यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राजधानी भोपाळमधील निवडणूक कार्यालय गाठून यासंदर्भात तक्रार पत्र दिले.

बालाघाटचे जिल्हाधिकारी गिरीश कुमार मिश्रा यांनी पोस्टल मतदानात अनियमितता केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या कामात सहभागी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली होती. पत्रात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे की, बालाघाटमधील काँग्रेस उमेदवाराने व्हिडिओ पाठवून तक्रार केली असून, त्यात जिल्हाधिकारी बालाघाट व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या पोस्टल व्होटमध्ये कथित अनियमितता उघडकीस आली आहे.

या घटनेचा व्हिडिओही निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. याप्रकरणी काँग्रेसने राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांच्यासह पक्षाचे शिष्टमंडळ काल दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले होते. याप्रकरणी तक्रार केली. बालाघाटमध्ये पोस्टल बॅलेटमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली आहे.