मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, दोघे फरार

0
252
crime

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – एका मंदिरातील दानपेटी फोडून दुसऱ्या मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे तर दोघे जण फरार झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री एक ते सव्वा एक च्या दरम्यान चिंचवड, काळभोरनगर येथे घडली आहे.

प्रदीप गंगाराम शिंदे (वय 58 रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रोहीत राहूल शिंदे (वय 22) याला अटक केली. तर लाला व बाबु (पुर्ण नाव माहिती नाही) हे दोघे फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे साई मंदिरातील दानपेटी तील अंदाजे 4 हजार रक्कम तसेच लाकडी पेटीचे कुलुप तोडून 11 हजार 478 रुपये रोख चोरून नेले आहेत. तसेच हे शिव मंदिरातील दानपेटी फोडून 7 हजार 478 रुपये चोरून नेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एका आरोपीला अटक केली असून दोघे फरार झाले आहेत. पिंपरी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.