मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला, ते चर्चेला तयार – संजय राऊत

44

– चार मंत्री आणि वीसहून अधिक आमदार गुजरात मध्ये

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत भूकंप झाले आहे. पक्षाचे मोठे नेते व मंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासह चार मंत्री आणि जवळपास वीसहून अधिक आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्यासह बहुतेक जण गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे गायब झाल्यानंतर संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे गुजरातला गेल्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. ते चर्चेसाठी तयार आहे. काही आमदारांशीही संपर्क झाला असून त्यांना परत येण्याची इच्छा आहे. पण तिथे घेराबंदी करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे हे कडवे शिवसैनिक आहेत. ते आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत. मुंबईवर विजय मिळवण्याची भाजपची भाषा आहे. ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपाच प्रयत्न केला जात आहे. भ्रम आणि फसवणूक करून आमदारांना गुजरातला नेले. भाजपचा हा घाव छातीवर नसून पाठीवर आहे, अशी टीका राऊतांनी केली.

सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला. सात स्तरांची सुरक्षाव्यवस्था दिली आहे. हे कशासाठी सुरू आहे. मध्य प्रदेश पॅटर्न राबवण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला अस्थिर करण्याची योजना आखली जात आहे. आमचे शिवसैनिक परत येतील. संपर्क साधला जात आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

हे आहेत नॉट रिचेबल आमदार

1. एकनाथ शिंदे

2. दादा भुसे

3. शंभूराज देसाई

4. अब्दुल सत्तार

6. संजय सिरसाट

7. संदीपान भुमरे

8. शहाजी पाटील

9. तानाजी सावंत

10. प्रकाश आबिटकर

11. ज्ञानराज चौगुले

12. किशोर पाटील

13. प्रताप सरनाईक

14. रमेश बोरणारे

15. उदयसिंह राजपूत

16. प्रदीप जैस्वाल

17. महेश शिंदे

18. शांताराम मोरे

19. विश्वनाथ भोईर

20. संजय राठोड

21. संजय गायकवाड

22. भरत गोगावले

23. महेंद्र थोरवे

24. श्रीनिवास वनगा