मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागा

0
202

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरुवात असताना आता भाजपच्या गोटातून अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपच्या सर्व आमदारांना हाय कमांडकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभेत सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत, त्यामुळे मंत्रिपदापेक्षा लोकसभा महत्त्वाची आहे, असा आदेशच भाजपच्या वतीने देण्यात आले आहे.

लोकसभेसाठी भाजपने मिशन ‘४५ प्लस’ लक्ष्य ठेवले आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने सर्व आमदारांकडे विशेष जबाबदारी दिली आहे. गणेशोत्सवानंतर फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारसंघ बांधण्याचे आदेश सर्व आमदारांना दिले गेले आहेत.

शिंदे गटाचे आमदार वारंवार मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा सांगत असतात. मात्र, विस्तारावर कसलीच चर्चा नसल्याचे आता माहिती समोर येत आहे. भाजपने लोकसभेला महायुती म्हणून ‘मिशन ४५ प्लस’चे लक्ष्य ठेवलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा भाजपने निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. यात महाराष्ट्र राज्याचं योगदान मोठे ठेवण्यासाठी भाजपने मतदारसंघनिहाय आमदारांना काम करण्याचे आदेश दिले आहेत.