भ्रष्टाचार प्रकरणी अडचणीत सापडलेले माजी वित्त सचिव अरविंद मायाराम राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी !

58

राजस्थान , दि. १३ (पीसीबी) -राजस्थानमधील अलवर येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत अरविंद मायाराम दिसल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत . मयाराम आणि त्यांची पत्नी शैल गांधींसोबत हातात हात घालून भारत जोडो यात्रेमध्ये दिसून आले . माजी वित्त सचिव अरविंद मायाराम भ्रष्टाचार प्रकरणी अडचणीत सापडले होते अद्याप सीबीआयने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. तसेच अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.मयाराम यांच्यावर आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव असताना चलन छपाई प्रकरणात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे.

मयाराम यांनी ब्रिटिश-फर्म DelaRue ला भारतीय बँक नोटांसाठी खास कलर शिफ्ट (सुरक्षा धागा) पुरवठा करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी बेकायदेशीर मुदतवाढ दिल्याचा आरोप आहे.ब्रिटीश फर्मला दिलेल्या अवाजवी उपकारामुळे भारतीय तिजोरीचे नुकसान होऊन चुकीचा फायदा झाला, असा आरोप यात करण्यात आला आहे.