भोसरी मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याची प्रवाशांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

0
166

पिंपरी, दि. २ (पीसीबी) : पुण्यात मेट्रो रेल्वेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण पिंपरी-चिंचवड मुख्यालय ते शिवाजीनगर कोर्ट या मार्गावरील भोसरी स्टेशनवरुन प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळं या मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (महामेट्रो) केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडं केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून जाणारे मेट्रो मार्ग गेल्या एक ते दीड वर्षात दोन टप्प्यात सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गांची उद्घाटनं झाली. यांपैकी येत्या मार्च महिन्यात पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरील मार्गाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. पण आता प्रवाशी संघटनेनं या मार्गावरील भोसरी स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.
भोसरी स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. भोसरी ऐवजी या स्टेशनचं नाव नाशिक फाटा असं करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. कारण या स्टेशनला भोसरी नाव दिल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

हे स्टेशन ज्या ठिकाणी स्थित आहे त्या भागाला नाशिक फाटा नावानं ओळखलं जातं तर भोसरी या ठिकाणाहून पाच किमी दूर आहे. सध्याचं स्टेशन आणि नाशिक फाटा ही ठिकाणी पुणे-मुंबई हायवेवर येतात. तर भोसरी हे ठिकाण पुणे-नाशिक हायवेवर येतं.