भोसरी मंडईत भाजी खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल पळवला

121

भोसरी, दि. १२ (पीसीबी) -भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारी भोसरी येथे घडली.

लक्ष्मण कोंडीबा जाधव (वय 62, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ भाजी खरेदीसाठी गेले होते. ते भाजी खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.