भोसरीत प्रियकराच्या मित्राने केला विनयभंग

0
308

प्रियकरा सोबत आलेल्या त्याच्या मित्राने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना आदर्श नगर, मोशी येथे सोमवारी (दि. ८) घडली.

ऋषिकेश जगताप (वय 25, रा. आदर्श नगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी ही सोमवारी आपल्या प्रियकरास भेटण्यासाठी आदर्श नगर, मोशी येथे आली. मात्र प्रियकर घरी नसल्याने तिने प्रियकराला फोन लावून बोलविले. त्यावेळी प्रियकरासोबत आलेला त्याचा मित्र आरोपी ऋषिकेश याने काहीही कारण नसताना फिर्यादी तरुणीस शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करीत फिर्यादी तरुणीचा विनयभंगही केला.