भोसरीत क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

0
1038

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एक कोटी 27 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 13 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीत इंद्रायणी नगर भोसरी येथे घडला.जगदीश दत्तात्रय मुळे (वय 46, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटस अप क्रमांक ₊601121145290, ₊917001120699, ₊918305051379, ₊918292308899, ₊628989737330, टेलिग्राम आयडी SCAVS 1966, alyssa 1957, सॅंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मिस अॅना कर्दशियन, आलस्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांना क्रिप्टो करंसीमध्ये ट्रेडिंग केल्यास चांगला फायदा होईल असे आमिष दाखवले. मोठ्या रकमेचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. GEE/CAE या फसव्या क्रिप्टो करंसी ट्रेडिंग अॅप्लिकेशनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादीकडून तब्बल एक कोटी 27 लाख 29 हजार 700 रुपये घेतले. ते पैसे आरोपींनी स्वतासाठी वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.