भोसरीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर गव्हाणे यांचे निधन

0
532

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – भोसरी पंचक्रोशितील सामाजिक कार्यकर्ते शंकर हरिभाऊ गव्हाणे (वय-६६) यांचे आज दुपारी तीन च्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुरेख, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे.

भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने दोन वेळा त्यांनी महापालिका निवडणूक लढविली होती. नंतर राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या पत्नी सुरेखा या महापालिकेत निवडूण आल्या होत्या. भोसरी पंचक्रोशितील सार्वजनिक कार्यात शंकर गव्हाणे यांचा नेहमी पुढाकार असे. त्यांच्या निधनामुळे या परिसरात शोककळा पसरली आहे.सायंकाळी साडेसात वाजता भोसरी यथील तळ्याजवळच्या स्मशानात त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.