भारत माता चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

0
60

मोशी येथील भारत माता चौकात असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम, सेंटर मध्ये प्रवेश करून मशीनवर फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली.

उमेश लक्षमण लामखडे (वय 38, रा. चऱ्होली बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी मधील भारत माता चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. मंगळवारी मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती सेंटरमध्ये आले.त यांनी सुरुवातीला एटीएम सेंटर मधील सीसीटीव्ही कॅमेरे लाकडी दांडक्याने तोडले. त्यांनतर एटीएम मशीनचा दरवाजा, प्रेझेंटर, मॉनीटर व सेफ्टी लॉक तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.