भाजप जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या संकल्प पूर्तीचा रोडमॅप

0
56

दि १४ एप्रिल (पीसीबी )- पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात युवा, नारीशक्ती, गरीब, शेतकऱ्यांवर, उद्योजकता यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या संकल्पांची पूर्तता करण्याचा रोडमॅप सादर केला आहे.

बचत गटांना आयटी, आरोग्य, पर्यटन क्षेत्रात प्रशिक्षण देणार

उज्ज्वला योजनेतंर्गत गरीब महिलांना सबसिडी जाहीर केली होती, ती आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

गरिब खेळाडूंना विशेष मदत देणार, महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार

तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

पुढील पाच वर्षे मोफत रेशन योजना सुरू राहणार

तृतीय पंथियांना आयुष्यमान योजनेत आणणार

पाईपमार्फत स्वस्त गॅस घरोघरी पोहोचवणार

मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.

शेतकरी, पशुमालक, मासेमारी करणाऱ्यांना सशक्त बनविणार

तमिळ भाषाला वैश्विक भाषा करण्यासाठी प्रयत्न करणार

७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणणार

गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे.

एक राष्ट्र, एक निवडणूक आणि समान मतदार यादी प्रणाली सुरू केली जाईल.

वंदे भारत 3 प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो

बुलेट ट्रेन नवीन उत्तर,दक्षिण पुर्व भारतात टाकणार

देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिभर करणार.

ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब निर्माण करा

आमचं सरकार गरीबांसाठी समर्पित सरकार आहे, आम्ही देशाच्या विकासाचा रोडमॅप समोर ठेवला आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाचा, गावाचा विकास झाला आहे. राम मंदीरासाठी मोदींचे मोठे योगदान आहे. महिला सशक्तीकरणासाठी भाजप सरकारने काम केले, असे जे.पी नड्डा यांनी सांगितले.

युवक, महिला, शेतकरी आणि गरीब अशा चारच जाती असल्याचे असे पंतप्रधान मोदी वारंवार सांगत आहेत. हे लक्षात घेता समाजातील या चार घटकांच्या उत्थानासाठी अनेक उपाययोजनांचा समावेश जाहीरनाम्यात आहे. नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान देण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. भाजप आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींचे संकल्प पूर्ण करण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे, असे नड्डा म्हणाले.
भाजपच्या जाहीरनाम्याची थीम “मोदीची हमी: विकसित भारत 2047” सोबत सांस्कृतिक राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित करेल. ज्या आश्वासनांची पूर्तता करता येईल, तीच आश्वासने पक्ष जाहीरनाम्यात समाविष्ट करेल. विकास, समृद्ध भारत, महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी यावर या जाहीरनाम्यात भर असेल.

निवडणूक जाहीरनाम्यासाठी भाजपने जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. 15 लाखांहून अधिक सूचना मिळाल्या होत्या. 4 लाख लोकांनी नमो ॲपद्वारे आणि 11 लाख लोकांनी व्हिडिओद्वारे त्यांच्या सूचना पक्षाला दिल्या होत्या.