भाजप अध्यक्ष नढ्ढा यांच्या जागेवर आठवड्यात नवनियुक्ती

0
61
  • शिवराजसिंह चौहाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा

दि २ जून (पीसीबी ) – लोकसभा निडवणूक 2024 च्या निकालानंतर भाजप पक्ष संघटनेत मोठे फेरबदल दिसतील. केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते राज्य पातळीपर्यंत मोठे बदल दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचा कार्यकाळा हा 6 जून रोजी संपणार आहे. भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. देशभरातून अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात राज्यातील या नेत्याचे नाव पण आघाडीवर असल्याचे समजते.

लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागेल. तर राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ 6 जूनला संपत आहे. त्यानंतर संघटनात्मकदृष्ट्या पक्षात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राज्यातील नेते विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे सुद्धा समोर येत आहेत. महाराष्ट्र भाजप संघटनेत पण मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना संघटनात्मक बदलांवर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या संघटनेत काय काय बदल होऊ शकतात केंद्रीय नेतृत्व असतं या संसदीय मंडळ ठरवत असतं आणि बदल ही भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रक्रिया आहे. बाकीच्या पक्षांमध्ये त्या ठिकाणी एकच अध्यक्ष असतो. एकच नेतृत्व असतं परंतु भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने पक्षांतर्गत सुद्धा निवडणुका किंवा नेमणुका त्या ठिकाणी होत असतात, असे ते म्हणाले.

भाजपातंर्गत दर तीन वर्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष बदलला जातो किंवा अध्यक्षांना पुन्हा संधी दिली जाते. अध्यक्षाला मुदत वाढ देण्यात येते, असे दरेकर म्हणाले. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी जून महिन्यात संपला होता. त्यावेळी त्यांना एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली होती. भाजप पक्ष घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येते. त्यामुळे 4 जूनच्या निकालापूर्वी अथवा नंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होऊ शकते आणि नावाची घोषणा होऊ शकते.

राज्यातील भाजप नेते विनोद तावडे यांचे नाव पण राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. अशा प्रकारे नाव चर्चेत असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम सर्व माणसांना निश्चितच त्याचा अभिमान वाटेल आनंद होईल. प्रत्येकाला वाटतं आपल्या प्रदेशातला नेता त्या ठिकाणी जर मोठा होणार असेल. त्याला नेतृत्व मिळणार असेल तर आनंद होणारच असे दरेकर म्हणाले