भाजपा पिंपरी चिंचवड महिला मोर्चा सचिव पदी पल्लवी पाठक

0
131

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – भाजपा पिंपरी चिंचवड महिला मोर्चा सचिव पदी पल्लवी पाठक यांची नियुक्ती झाली. भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप व महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी महिला मोर्चा प्रदेश सदस्या कविता हिंगे,भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे,भाजपा चिंचवड निवडणूक प्रमुख काळूराम बारणे,प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,सर चिटणीस विलास मेडिगेरी, आजय पाताडे,संजय मंगोडकर,युवा मोर्चा प्रदेश अनुप मोरे,भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे,नगरसेविका,शारदा सोनवणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच उपस्थित अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पल्लवी पाठक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.