भाई असल्याचे म्हणत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

139

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – मी बालाजीनगरचा भाई आहे, असे म्हणत एकाने अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 27) दुपारी बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

आदित्य बंडू फरताडे (वय 17, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फारुख उर्फ फ-या सत्तार शेख (वय 24, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बुधवारी दुपारी तीन वाजता कोयता घेऊन, मी बालाजीनगरचा भाई आहे, आता मी तुला मारूनच टाकतो, असे म्हणून फिर्यादीवर कोयत्याने वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीच्या दहशतीमुळे परिसरातील लोकांनी घाबरून घराचे दरवाजे बंद करून घेतले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.