भांडण मिटविण्यासाठी मागितली खंडणी

345

मारहाण करत कोयत्याने केले वार

रावेत, दि. १५ (पीसीबी) – दुचाकीला फूटबॉल लागल्याने वाद घालून भांडण मिटविण्यासाठी खंडणी मागितली. तसेच कोयत्याने डोक्यात वार करून तरुणाला जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी किवळे येथील एका कॉफी शॉपमध्ये घडली.

पृथ्वीराज दत्तात्रय पाटील (वय 23, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिया युसूफ खान, हसन शेख (दोघे रा. कृष्णनगर, देहूरोड), स्वस्तिक गणेश शेट्टी (रा. गहुंजे, ता. मावळ) आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र फूटबॉल खेळत होते. त्यावेळी त्यांच्याकडून फूटबॉल जवळ उभ्या असलेल्या बुलेटला लागला. त्यावेळी हसन आणि स्वस्तिक हे तिथे आले. त्यांनी दुचाकीला बॉल का मारला असे म्हणत फिर्यादींसोबत वाद घातला. त्यांनतर गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता किवळे येथील कॉफी शॉपमध्ये असताना मिया खान हा आला. त्याने जुने भांडण मिटविण्यासाठी एक पेटी दे, असे म्हणत खंडणी मागितली. त्यानंतर फिर्यादीस मारहाण करून हसन शेख याने कोयत्याने फिर्यादींच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. स्वस्तिक शेट्टी आणि इतर दोन साथीदारांनी फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.