भंगार दुकानात दोन लाखांची चोरी

0
49

भंगार दुकानातून चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) खेड तालुक्‍यातील भांबोली येथे उघडकीस आली.

अब्दुल लतीफ सगीर शाहा (वय ३२, रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बारा ते शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांच्या भंगाराच्या दुकानातून पत्नीच्या उशाखाली ठेवलेले रोख ३५ हजार रुपये आणि एक लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्‍याचे दागिने व माबाइल असा दोन लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.