ब्रिटनमध्ये मुस्लिमांकडून हिंदू मंदिराची तोडफोड

32

लंडन, दि. २० (पीसीबी) – ब्रिटनमध्ये इंडियन हाय कमिशनने इंग्लंडच्या लीसेस्टर शहरात भारतीय समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची आणि या हल्ल्यातील पीडितांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. लीसेस्टर शहरात एका पक्षाने हिंदू मंदिरांची तोडफोड करत मंदिरावरील भगवा झेंडा काढून फेकला होता. त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे. काळे कपडे घातलेल्या मुस्लीम समुदायाने हे कृत्य केले असून १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

आम्ही लीसेस्टर शहरातील भारतीय समुदायाविरूद्ध हिंसाचार आणि हिंदू मंदिराची तोडफोड केल्या प्रकरणाचा तीव्र निषेध करतो.” असे इंडियन हाय कमीशनने त्यांच्या जबाबात नोंदवले आहे. आम्ही हे प्रकरण यूके प्रशासनाकडे परखडपणे मांडले असून या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्यांवर त्वरित कारवाई करण्याची यूके प्रशानाकडे मागणीही केली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मधे व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती काळ्या कपड्यांमध्ये मंदिराच्या इमारतीवर चढतो आणि इमारतीवर असलेला भगवा झेंडा उतरवतो. तर मंदिराची तोडफोड हिंदू आणि मुस्लीम समुदायांमध्ये झालेल्या वादादरम्यान करण्यात आली होती. हा वाद मागल्या महिन्यात झालेल्या ‘भारत पाकिस्तान एशिया कप क्रिकेट मॅच’मुळे झाला होता.