बेकायदा वृक्षतोडीविरोधात युवक काँग्रेसचे वाकडमध्ये आंदोलन

24

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात युवक काँग्रेसचे वतीने वाकड येथे आंदोलन करण्यात आले. झाडे लावा झाडे, जगवा, झाडे लावा श्वास वाचवा, जतन करा वृक्षाचे रोपण वाढवा, आयुष्य वाचवा, पर्यावरण जपा, अशी घोषणा देत पिंपरी चिंचवड पालिकेच्या उद्यान विभागातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

तोडलेल्या झाडांच्या बदल्यात एका महिन्याच्या आत त्याच ठिकाणी झाडे लावावीत. असा शासन आदेश असतानाही मोठा काळ उलटुन गेल्यानंतरही महापालिकेतर्फे झाडे लावण्यात आली नाहीत. या बाबत जबाबदारांवर कारवाई तसेच कायद्याने त्या झाडांचे पुन्हा रोपन करण्याची मागणी युवकांनी केली. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात एका महिन्याच्या आत झाड लावणे बंधनकारक होते. पण, झाडे लावली नाहीत. यामुळे संबंधीत अधिकारी, कंत्राटदारांवर कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

युवकचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात वाकड युवक शाखा अध्यक्ष विक्रम कुसाळकर, उपाध्यक्ष रोहन मढीकर, संतोष ओव्हाळ, प्रकाश घोडके, अमोल देवकर, सागर हुंडे, अक्षय गायकवाड, उमेश पोकळे, प्रसाद शिरसाठे, सुमीत मंडल , निलेश अडागळे, रोहित भाट,सौरभ शिंदे,अभिजित आटोळे,करण सोनवणे,विजय माने, रयत विद्यार्थी परिषदेचे सूर्यकांत सरवदे सहभागी झाले होते.