बॅनर फाडल्याचा जाब विचारत तरुणाला बेदम मारहाण, एकाला अटक

0
299

मंडळाचा बॅनर का फाडला म्हणत एका 25 वर्षीय तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.9) तळेगाव दाभाडे येथील भोईआळी येथे घडली आहे.

मयूर अनिल इंगळे (वय 25 रा.तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच मिथून पारखे, गौरव जरग, सौरभ जरग, विशाल शेळके, शगुन पारखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणी आकाश अशोक परदेशी (वय25 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसह उभे असताना आरोपी तेथे आले व बॅनर का फाडला म्हत त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीला वाचवण्यासाठी त्यांचे मामा आले अशता आरोपींनी त्यांनाही मारहाण करत जखमी केले. यावरून तळेगाव दाभाडे पोलीसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आ