बीड हिंसाचारातील आरोपीचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत

0
110

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून जाळपोळ, हिंसाचार, ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचे फोटो नेत्यांसोबत असल्याचे दाखवून एकमेकांना बदनाम करत आरोप-प्रत्यारोप करण्याचे काम राज्यातील राजकारण सुरु आहेत. आंतरवालीतील दगडफेकीमागचा मुख्य सुत्रधाराचा फोटो शरद पवारांसोबत असल्याचे ट्विट करत निलेश राणे यांनी सवाल केले होते. भाजप खासदारावर दगडफेक करणाऱ्या आरोपीचे फोटो शरद पवारांसोबत पोस्ट करण्यात आले होते. तर आता राष्ट्रवादीने (शरद पवार) बीड जाळपोळ आणि हिंसाचारातील आरोपीचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत असल्याचे शेअर करत राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली.

भाजप नेते नितेश राणे यांनी एक्सवर अंतरवाली सराटीतील मुख्य आरोपी ऋषीकेश बेंद्रे याचा शरद पवार आणि राजेश टोपेंसोबतचा फोटो पोस्ट करत गंभीर आरोप केले होते. यावर राजेश टोपे यांनी आपण बेंद्रेला ओळखत नसल्याचे एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुसऱ्या नेत्यांसोबतचे बदरे याचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत.यात आरोपी ऋषीकेश बदरे याचा नितेश राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसून येत आहे. तसेच यावरुन जयंत पाटील यांनी सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, हा बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे असे म्हटले आहे.