बिलावरून नातेवाइकाचा रुग्णालयात गोंधळ

0
34

चाकण, दि. ०१ (पीसीबी) : रुग्णाचा विमा पास न झाल्याने नातेवाईकाने गोंधळ घालत बिल न देता रुग्णास घेऊन गेला. ही घटना शनिवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास क्रिटीकेअर प्रा. लिमिटेड या हॉस्पिटलमध्ये घडली.

डॉ. राजेश नारायण घाटकर (वय 52, रा. शुभम कॉम्प्लेक्स, चाकण-शिक्रापूर रोड, चाकण) यांनी याबाबत सोमवारी (दि. 30) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास जाधव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास जाधव याचा नातेवाइक किशोर गणेश गव्हाणे (वय 25, रा. पानसरे मळा, चाकण) हे रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र त्यांचा टाटा एआयजी कंपनीचा विमा पास झाला नाही. या कारणावरून आरोपी विकास जाधव याने रुग्णालयात गोंधळ घातला. तसेच शिवीगाळ व दमदाटी करीत डिस्चार्ज दिलेला नसताना रुग्णालयाचे 34 हजार 200 रुपयांचे बिल न नेता रुग्ण किशोर गव्हाणे यांना घेऊन गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.