“बिग बॉस मराठीला ‘निक्की बिग बॉस मराठी’ असं नाव घोषित करा

0
54

दि. 15 (पीसीबी) – ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्याच्या शेवटी घरात एक राडा झाला. ‘जादूई हिरा’ उचलण्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या व निक्की यांच्यात वाद झाले. दोघींमध्ये धक्काबुकी झाली. पण शेवटी आर्याने रागाच्या भरात निक्कीवर हात उचलत तिला कानशिलात लगावली. यामुळे आर्याला तात्पुर्त जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली आणि कठोर शिक्षा ‘भाऊच्या धक्क्या’वर सुनावण्यात येणार असं जाहीर केलं.
त्यानंतर शनिवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर आर्याला ‘बिग बॉस’ने कठोर शिक्षा सुनावली. घरातील मोठ्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे ‘बिग बॉस’ने आर्याला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला. ‘बिग बॉस’च्या या निर्णयामुळे आर्याच्या चाहत्यांसह अनेक जण नाराज झाले आहेत. आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णया विरोधात निषेध करत आहेत. इतकंच नव्हे तर घराबाहेर केल्यामुळे ‘बिग बॉस मराठी’ पाहणं बंद केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याने देखील तीव्र संताप जाहीर केला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने आर्याला घराबाहेर काढल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट करत निषेध नोंदवला आहे. फेसबुकवर पोस्ट लिहित अंकुर म्हणाला, “बिग बॉस मराठीला ‘निक्की बिग बॉस मराठी’ असं नाव घोषित करा. हम करें सो कायदा…हा काय प्रकार आहे?” या पोस्टमध्ये त्याने बॉयकॉटचं हॅशटॅग वापरलं आहे.

अंकुर वाढवेच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, बरं झालं कोणीतरी यावर सच्च्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “स्क्रिप्टेड शो आहे. निक्की आणि अरबाजने विकत घेतला आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “चला…इतकं तरी नक्की आहे की, तू प्रत्येक भाग बारकाईने बघतोयस.” नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर अंकुर म्हणाला, “अरे मी पहिल्या पर्वापासून बघतो. पण हे पर्व अत्यंत थुकरट आहे.”

दरम्यान, सातव्या आठवड्यात निक्की, वैभव, अंकिता, अभिजीत, वर्षा आणि आर्या नॉमिनेट झाले आहेत. आर्या नुकतीच घराबाहेर गेली असली तरी उर्वरित पाच सदस्यांमधील एक सदस्य बेघर होणार आहे. त्यामुळे आता निक्की, वैभव, अंकिता, अभिजीत आणि वर्षा उसगांवकरांपैकी कोण एलिमिनेट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.