बालविवाह प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

67

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – बालविवाह केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदर मुलगी उपचारासाठी आली असता हा प्रकार उघडकीस आल्याने संबंधित महिला डॉक्टरांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 13 ऑक्टोबर 2021 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत छत्तीसगड येथे घडली. याप्रकरणी 22 वर्षीय पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे एक गरोदर महिला उपचारासाठी आली. मात्र ती अल्पवयीन असल्याचा संशय डॉक्टरांना आला. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता त्या मुलीचे वय 17 वर्ष होते. आरोपीने त्या 17 वर्षीय मुलीसोबत बालविवाह केला. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती 16 आठवड्यांची गरोदर आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.